खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरेया फाऊंडेशन आयोजित कबड्डीचा थरार…
मातीतील खेळाला प्रोत्साहन देण्याचा स्वरेया फाउंडेशन चा पुढाकार कौतुकास्पद : नगराध्यक्ष दिलीप गिरप
वेंगुर्ले : दाजी नाईक
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले येथे स्वरेया फाऊंडेशन पुरस्कृत आणि जय मानसीश्वर संघ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी महिलांच्या कबड्डी झाल्या रात्री उत्तरोत्तर कबड्डी स्पर्धेत महिलांचा थरारक खेळ वेंगुर्लेवासियांना पाहायला मिळाला. अंतिम सामन्यात एस. एम. सिंधू कुडाळ संघावर मात करीत अनिकेत स्पोर्ट्स क्लब, खेड या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर नाव कोरले. दरम्यान खेळामुळे तरुणांमध्ये शिस्त आणि जिद्द निर्माण होते. कबड्डीसारख्या मातीतील खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वरेया फाउंडेशनने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी उद्घाटनपर बोलताना केले.
वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन आणि वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपनगराध्यक्ष सुहास गवंडकर, आणि वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनराज गोस्वामी, स्वरेया फाउंडेशन अध्यक्ष श्रेया महाजन, सचिव धनंजय महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगरसेवक प्रणव वायंगणकर, शितल आंगचेकर, रिया केरकर, लीना म्हापणकर, समिधा रेडकर, गौरी मराठे तसेच पंकज शिरसाट, राकेश सापळे, गणेश अंधारी, राजू वजराटकर, निखिल शिरोडकर, तुषार भोसले, कमलेश सामंत आदी उपस्थित होते.
अतिशय चुरशीमध्ये झालाअंतिम फेरीचा थरार
अंतिम सामना अनिकेत स्पोर्ट्स क्लब, खेड विरुद्ध एस. एम. सिंधू कुडाळ यांच्यात रंगला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अनिकेत स्पोर्ट्स क्लबने २७-२१ अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.
स्पर्धेचे निकाल विजेता: अनिकेत स्पोर्ट्स क्लब, खेड तर
उपविजेता: एस. एम. सिंधू कुडाळ आणि तृतीय क्रमांक: स्वराज्य स्पोर्ट्स, चिपळूण व
चतुर्थ क्रमांक: होलीक्रॉस, सावंतवाडी यांनी मिळविला.वैयक्तिक पारितोषिके: उत्कृष्ट पकड: समरीन बुवेडकर
उत्कृष्ट चढाई: मिताली गावडे
अष्टपैलू खेळाडू: सिद्धी चाळके हिला गिरविण्यात आले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा निरीक्षक श्री. तुषार साळगावकर, पंच प्रमुख हेमंत गावडे, राजू बेग, मनोज पटकर, सी. एस. नाईक, वसिम शेख, प्रथमेश नाईक, दिपक चव्हाण, प्रियांका कोरगावकर, त्र्यंबकेश ढगळे, सूरज पवार यांनी आणि स्पर्धा संयोजक श्री. जयेश परब यांनी विशेष परिश्रम घेतले. खेळाडूंच्या जिद्दीला आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाला दाद देत या स्पर्धेची सांगता उत्साहात झाली.
जय महाजन यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे बक्षीस वितरण..
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वरेया फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये गौरेश वायंगणकर, मिलरॉय फर्नांडीस, ओमकार साटेलकर, विकास कोरगावकर, संकेत साटेलकर, लक्ष्मण तलवार, नामदेव सरमळकर, निखिल गावडे, साईराज परुळेकर, प्लेविन रॉटविक्स, अपूर्वा परब, निकिता फर्नांडिस, ग्यावीन मोंतेरो आणि आकाश साळकर यांचा समावेश आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण स्वरेया फाउंडेशनचे सचिव जय महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे तसेच पंकज शिरसाट आणि नगरसेवक प्रीतम सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते.












