वेंगुर्ले शहरातील श्री रामेश्वर मंदिर कडील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ : पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले शहरातील श्री रामेश्वर मंदिर ते वेर्णेकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थिती मध्ये वेंगुर्ले चे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या प्रभागातून संदेश निकम हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. उबाठा मधून निवडून आले असतानाही त्यांनी आपल्या प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे केली होती. त्या मागणीचा विचार करून हा रस्ता कामासाठी ५० लाख रुपये निधी पालकमंत्री यांनी उपलब्ध करून दिला. त्यामुळे संदेश निकम यांनी पालकमंत्री यांचे आभार मानले.

दरम्यान वेंगुर्ले येथील या रस्ता कामाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले. यावेळी नगरसेवक संदेश निकम, नगरसेविका सौ. सुमन निकम तसेच भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगरसेवक दाजी परब, प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालेकर तसेच कमलेश गावडे, प्रसाद गुरव व अन्य नागरिक उपस्थित होते.