न्हावेली येथील रस्ता कामाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन…

  • दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर; उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा यशस्वी पाठपुरावा…

 

न्हावेली प्रतिनिधी- श्रेयस गावडे

न्हावेली येथील पार्सेकरवाडी ते पंचदेवी वाडी या रस्ता कामाचे जनसुविधा योजनेअंतर्गत भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार दीपक केसरकर आणि संजू परब यांच्या विशेष सहकार्यातून या रस्त्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे या भागातील ग्रामस्थांचा अनेक वर्षांचा रस्ते प्रश्न मार्गी लागला आहे.

न्हावेलीचे उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांनी या रस्त्यासाठी सातत्याने वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता. ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार केसरकर व संजू परब यांनी या कामाला प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अक्षय पार्सेकर, प्रशांत साटेलकर, माजी सरपंच शरद धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश चंद्रकांत नाईक, सानिका हळदणकर, स्नेहा पार्सेकर, संतोष नाईक आणि आरती माळकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्याप्रसंगी न्हावेलीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये दीपक नाईक, ओम पार्सेकर, दीपक पार्सेकर, राज धवन, तुकाराम पार्सेकर, अमोल पार्सेकर, अक्षरा पार्सेकर, सुंदर पार्सेकर, अनिकेत धवन, धनेश नाईक, परेश दळवी, भावेश पार्सेकर, कुणाल पार्सेकर, ओंकार निर्गुण, दत्तप्रसाद पार्सेकर, विकास मांजरेकर, गुंडू पार्सेकर, कृष्णा पार्सेकर, कांता पार्सेकर, सचिन पार्सेकर, संतोष पार्सेकर, गोविंद पार्सेकर, नाना मांजरेकर, बाबू पार्सेकर, सतीश पार्सेकर, अजय पार्सेकर, संकेत पार्सेकर, सत्यवान पार्सेकर, दशरथ पार्सेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत यावेळी ग्वाही देण्यात आली. या विकासकामाबद्दल पार्सेकरवाडी व पंचदेवी वाडीतील ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर, संजू परब आणि अक्षय पार्सेकर यांचे मनापासून आभार मानले आहेत