पावस माऊली माहेर येथे भाजपाच्या पावस गोळप कार्यकर्त्यांची टिफिन बैठकीचे आयोजन

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्यातील पावस माऊली माहेर येथे ४ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद गट पावस गोळप कार्यकर्त्यांची टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माजी आमदार रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब माने, माजी नगराध्यक्ष रत्नागिरी अशोक मयेकर, सतीश शेवडे, नाना शिंदे, आनंद देसाई, सुशांत पाटकर यांच्या उपस्थितीत टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी उपस्थित पावस गोळप गटातील कार्यकर्त्यांना श्री. माने यांनी मार्गदर्शन केले. सतीश शेवडे, अशोक मयेकर, राजापूरच्या माजी नगराध्यक्ष मराठे यांनी आपले विचार मांडले. सुशांत पाटकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल.

गेल्या निवडणुकांमध्ये ज्या काही चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असं आव्हान कार्यकर्त्यांना बाळ माने यांनी केले. तसेच संपर्क से समर्थन 9090902024 मिस कॉल देऊन मोदी सरकारला समर्थन देण्याचं आव्हान बाळ माने यांनी केले पंतप्रधान पदासाठी ‘ तिसरी बार मोदी सरकार’ या टॅग लाईन वरती देशात चारशेच्या वरती खासदार निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिलं पाहिजे असं मत रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब माने यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी रत्नागिरीचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हे मुंबई येथे पक्षाच्या बैठकीनिमित्त गेले असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्याबद्दल त्यांनी फोन करून दिलगिरी व्यक्त केली.