वैभववाडी : अरुळे ता.वैभववाडी,जि. सिंधुदुर्ग येथील शिवारात जाऊन कृषी महाविद्यालय सांगुळवाडी ता.वैभववाडी,जि. सिंधुदुर्ग येथील कृषी कन्यांनी शेतीमधील नवनविन तंत्रज्ञानांबाबत शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिके दाखवून त्यांची महिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत सांगुळवाडी कृषीमहाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रबोधन केले.त्यात विद्यार्थी प्रतिनिधी,कु.श्रीलक्ष्मी बैकर, कु.ऋतुजा कांबळे, कु.माधुरी नांदोस्कर,कु.शुभांगी देशिंगे,कु.मिताली मुकनाक,कु.समीक्षा सकटे, कु.पल्लवी पाटील,कु.श्रुती पवार,कु.प्रतिष्ठा बाबर,या विद्यार्थिनिंनी सहभाग घेतला.बीज प्रक्रिया,चारा प्रक्रिया,फळबाग लागवड,माती परिक्षण, तण नियंत्रण पद्धती, किटक नाशक फवारणी, रान भाज्या प्रदर्शन,दापोली विद्यापीठ विकसित शेती उपयोगी अवजारे आणि विविध पिकांच्या जातींचे प्रदर्शन,या बाबत मार्गदर्शन केले.त्यात,मा. सरपंच सौ.मानसी रावराणे, उपसरपंच मा.श्री.रमेश वारंग,ग्रामसेवक प्रशांत जाधव, मा. श्री.उज्ज्वल नारकर, मा.श्री सुहास जांभळे , मा.श्री.बोडके सर यांनी सहकार्य केले व गावातील लोकांनी सहभाग दाखवला











