खेड मध्ये महिलेची ३ लाख ५८ हजाराची ऑनलाइन फसवणूक

crime online fraud

खेड(प्रतिनिधी) मोबाईल वर अप चेक करत असताना खात्यावरून अज्ञाताने अचानक ३ लाख ५८ हजाराची रक्कम अन्य खात्या मध्ये ऑन लाईन ट्रान्सफर करून लाखो रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी तृप्ती प्रवीणचंद्र सोनोने यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३०वाजण्याच्या सुमारास त्या मोबाईल अप चेक करत असताना त्यांच्या आयसीआयसीआय या बँकेच्या खात्यावरून सुरवातीला २५ हजार , ३३ हजार, व त्यानंतर तीनवेळा १ लाख असे ३ लाख ५८ हजार रुपये एका अनोळखी खात्यावर वळते करून फसवणूक केली

या प्रकारा नंतर सोनोने यांनी येथील पोलीस स्थानक गाठून याबाबतची तक्रार दाखल केली असून अज्ञात वर भा द वि क ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ९६ क , ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे