उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, यांनी दिली माहिती
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली टप्पा गाठलेल्या या महाविद्यालयाचा हा सोहळा येत्या ४ व ५ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, ४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, गेल्या ५० वर्षांतील महाविद्यालयाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारा माहितीपट यावेळी सादर केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद नाईक, राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री, तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत व चितळे उद्योग समूहाचे संचालक श्रीकृष्ण चितळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २ वाजता माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी ३.३० वाजता माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा, तर सायंकाळी ५ वाजता माजी विद्यार्थ्यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार, ५ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम (सादरकर्ते BPA चे विद्यार्थी) होणार आहे. सायंकाळी ५ वाजता समारोप समारंभ होणार आहे. याच वेळी सुवर्ण महोत्सवानिमित्त एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक आहेत. तसेच कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजयराव साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, व सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई व सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी व सुवर्ण महोत्सव समन्वयक प्रा. वैभव कानिटकर आणि अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत. माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने केले आहे.











