२१ वर्षाखालील मुलांमध्ये पाच किमी अंतराच्या स्विमिगमध्ये सिंधुदुर्गचा भाग्येश पालव प्रथम तर मुलींमध्ये रत्नागिरीची तनया मिलके प्रथम विजेती
विजयदुर्ग ( बाळा कदम ) महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील ११० जलतरणपट्टू सहभागी झालेल्या विजयदुर्ग येथील ९ व्या सरखेल कान्होजी आंग्रे विजयदुर्ग खाडीतील खुल्या जलतरण स्पर्धेला रसिकांचाही उदंड प्रतिसाद लाभला. येथील दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि जिम स्विमिंग अकॅडमी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सहभागी झालेल्या जलतरणपटुंनी ही स्पर्धा पूर्ण केली.
स्पर्धेचे उद्घाटन राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने यांनी केले. यावेळी दुर्गामाताचे पदाधिकारी रविकांत राणे, दीपक करंजे, जिम स्विम अकॅडमीचे सर्वेसर्वा अजय पाठक, कोल्हापूर तसेच जिल्हा जलतरण संघटनेचे ॲड सुशील पाटील, स्पर्धा निरीक्षक कैलास आखाडे उपस्थित होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उस्मानाबाद जलतरणचे पांडुरंग रनखांब, ठाण्याचे ॲड. मोरे, कोल्हापूर जलतरणचे ॲड. प्रवीण भंडारी, कपिल मेथी, शुभांगी मंगलोरकर, तेजस्विनी मेथे, विश्वनाथ घोरपडे सरकार, रविकांत राणे, दीपक करंजे, प्रदीप साखरकर यांच्या हस्ते पार पडला.
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यात आला.
वयोगट सात वर्षे मुलांमध्ये पाचशे मीटर प्रथम क्रमांक आदेश जाधव रत्नागिरी, द्वितीय क्रमांक चिराग CA कर्नाटका, तृतीय क्रमांक निवेश व्हावळ ठाणे, चतुर्थ क्रमांक कियान मेथे तर अवघ्या रत्नागिरीच्या चार वर्षाच्या इजहान कापडे याने स्पर्धा पूर्ण केली. सात वर्षाखालील मुली 500 मीटर प्रथम क्रमांक अद्विका गौडा कर्नाटक, द्वितीय क्रमांक गाथा दड्डीकर बेळगाव, तृतीय क्रमांक शीशा मयूर ठाणे. नऊ वर्षाखालील मुले एक किलोमीटर प्रथम क्रमांक हर्षवर्धन कर्लेकर बेळगाव, द्वितीय क्रमांक मयंक चव्हाण कोल्हापूर, तृतीय क्रमांक सिद्ध मुपीनिट्टी ठाणे, चतुर्थ क्रमांक मोहक गौडा कर्नाटका, पाचवा क्रमांक गुरुराज पाटील कोल्हापूर. नऊ वर्षाखालील मुली एक किलोमीटर प्रथम क्रमांक दूर्वा चव्हाण कोल्हापूर, द्वितीय क्रमांक गुणीश्का येल्लाजी बेळगाव, अकरा वर्षाखालील मुले एक किलोमीटर प्रथम क्रमांक अर्णव पिळणकर रत्नागिरी, द्वितीय क्रमांक स्कंद गाडगे बेळगाव, तृतीय क्रमांक कर्णसिंह घोरपडे कोल्हापूर, चतुर्थ क्रमांक विहांद दळवी रत्नागिरी, पाचवा क्रमांक ज्ञानेश गोइलकर कोल्हापूर. अकरा वर्षाखालील मुली एक किलोमीटर प्रथम क्रमांक वैष्णवी शिरोडकर गोवा, द्वितीय क्रमांक समयरा भोंसले गोवा, तृतीय क्रमांक सोयरा मनोलकर बेळगाव, चतुर्थी क्रमांक कादंबरी काकडे कोल्हापूर, पाचवा क्रमांक प्रणामय्या प्रभू बेळगाव.
तेरा वर्षाखालील मुले दोन किलोमीटर शौर्या राऊत रत्नागिरी, पुणीत बंग कोल्हापूर, अभय तवंदकर कोल्हापूर रंजन कुलकर्णी बेळगाव अर्णव भंडारी कोल्हापूर अकरा वर्षाखालील मुली प्रथम क्रमांक कृष्णा हार्व्याशी कोल्हापूर, द्वितीय क्रमांक संपिता व्हावळ ठाणे तृतीय क्रमांक धृती कोळी ठाणे, चतुर्थी क्रमांक काव्या मेथे कोल्हापूर, पाचवा क्रमांक त्रिधा फणसेकर ठाणे. पंधरा वर्षाखालील मुले दोन किलोमीटर प्रथम क्रमांक वरून राज डोंगळे कोल्हापूर, द्वितीय क्रमांक विधान धुरी सिंधुदुर्ग, तृतीय क्रमांक मेघराज डोंगळे कोल्हापूर, चतुर्थ क्रमांक अंजनेय काटकर कोल्हापूर, पाचवा क्रमांक आयुष कटाळे रत्नागिरी. पंधरा वर्षाखालील मुली तीन किलोमीटर प्रथम क्रमांक राजनंदिनी तिवले कोल्हापूर, द्वितीय क्रमांक अनन्या पत्की कोल्हापूर, तृतीय क्रमांक निधी भिडे रत्नागिरी, चतुर्थ क्रमांक अनुष्का बजाज कोल्हापूर, पाचवा क्रमांक मानवी बंग कोल्हापूर. सतरा वर्षाखालील मुले तीन किलोमीटर प्रथम क्रमांक आदित्य बर्गे, द्वितीय क्रमांक पार्थ शेट्टी कर्नाटका, तृतीय क्रमांक रुद्र मनाडे कोल्हापूर, चतुर्थी क्रमांक आयुष काळे रत्नागिरी, पाचवा क्रमांक योगेंद्र तावडे रत्नागिरी. सतरा वर्षाखालील मुली तीन किलोमीटर प्रथम क्रमांक चैत्राली नवले सातारा, द्वितीय क्रमांक सानवी पवार रत्नागिरी, तृतीय क्रमांक आरोही पिळणकर रत्नागिरी, चतुर्थ क्रमांक प्राजक्ता प्रभू बेळगाव, पाचवा क्रमांक वृंदा गोईलकर कोल्हापूर. २१ वर्षाखालील मुले पाच किलोमीटर प्रथम क्रमांक भाग्येश पालव सिंधुदुर्ग, द्वितीय क्रमांक स्मरण मंगलोरकर बेळगाव, तृतीय क्रमांक पुष्कर गवळी कोल्हापूर, चतुर्थी क्रमांक आत्मज अकोलकर ठाणे, पाचवा क्रमांक रोहित पटेकर ठाणे. २१ वर्षाखालील मुली पाच किलोमीटर प्रथम क्रमांक तनया मिलके रत्नागिरी, द्वितीय क्रमांक श्रावणी रणखांब धाराशिव, ३५ वर्षाखालील पुरुष पाच किलोमीटर प्रथम क्रमांक करण मिलके रत्नागिरी, द्वितीय क्रमांक अल्फराज कापडे रत्नागिरी, ३५ वर्षाखालील महिला पाच किलोमीटर प्रथम क्रमांक समिधा मोरे ठाणे, द्वितीय क्रमांक गौरी राऊत ठाणे. ५० वर्षाखालील पुरुष दोन किलोमीटर प्रथम क्रमांक राजू कलकुटगी कोल्हापूर, द्वितीय क्रमांक रमेश बंग कोल्हापूर, तृतीय क्रमांक विपुल पवार मुंबई, चतुर्थ क्रमांक कोल्हापूर, पाचवा क्रमांक महेश पवार धाराशिव. ५० वर्षाखालील महिला दोन किलोमीटर प्रथम क्रमांक गौरी मिलके रत्नागिरी, द्वितीय क्रमांक रेखा अमयप्पन ठाणे, तृतीय क्रमांक असिता पवार पुणे, ५१ वर्षावरील पुरुष दोन किलोमीटर प्रथम क्रमांक श्रीमंत गायकवाड सातारा, द्वितीय क्रमांक अजित पिळणकर रत्नागिरी. ५१ वर्षावरील महिला प्रथम क्रमांक गायत्री फडके पुणे. या स्पर्धेसाठी विजयदुर्ग बोटिंगचे सर्व पदाधिकारी, तालुका आरोग्य कार्यालय देवगड, पुरळ पं. स. सदस्या संजना आळवे, विजयदुर्गचे माजी सरपंच प्रसाद देवधर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा पाहण्यासाठी विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्व क्षेत्रातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.











