भरणे येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

सोवेली येथे सेना नेते रामदास कदम यांनी केले पक्षात स्वागत

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील भरणे घडशीवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी मंडणगड तालुक्यातील सोवेली येथे शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने भरणे विभागात राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे.

खेड तालुक्यातील भरणे घडशीवाडी येथील आदित्य शिगवण, चिराग घडशी, संजय नलावडे, दिपेश घडशी, रघुनाथ धुमक, प्रवीण चीले, सुयेश भालेकर, मंदार मेटकर, जयदीप भुवड, सचिन तटकरी, अमित खांबे, सुमित शिगवण, सौरभ व्हलकर, ओमकार शिंदे,
अथर्व मगदूम, शुभम पवार, अतिश उसरे, कृणाल घडशी, साहिल घडशी, रोहन घडशी, हेरंब नलावडे, साहिल नलावडे, अभिलेश।चिले, नितीन शिगवण, किशोर पाटणे, रूतेश दासरे आदी युवकांनी शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्या समवेत मंडणगड
तालुक्यातील सोवेली येथे शिवसेना नेते रामदास कदम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.