खेड (प्रतिनिधी)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात १८ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडाला धडकला. या अपघातात चालक जखमी झाला.
खेड कशेडी घाटातील आंबा पट्टी स्टॉप जवळ १८ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात चालक कैफ खान (३० रा. उत्तर प्रदेश) जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणीज धामची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी चालकाला उपचारासाठी कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले.










