माळगाव बाळोजीची वाडी येथे 4 मे रोजी धार्मिक कार्यक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर  : माळगाव बाळोजीची वाडी येथे ४ मे रोजी श्री जरीमरी माता मित्रमंडळ (ग्रामस्थ) यांनी लघुअभिषेक व श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले आहे . सकाळी ९ ते ११ वा.लघुअभिषेक, दु.१२ ते १ वा. आरती, दु. १ ते २ महाप्रसाद, सायं.४ ते ६ वा.श्री सत्यनारायण महापूजा , सायं.७ ते ८ वा. आरती व तीर्थप्रसाद, रात्री ८.३० ते १० वा. महाप्रसाद, रात्री ८ ते १० वा. सुस्वर भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व भाविकांनी महाप्रसादाचा व सायंकाळी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जरीमरी माता मित्रमंडळ (ग्रामस्थ)माळगाव बाळोजीची वाडी यांनी केले आहे.