कुडाळमध्ये १८ जानेवारीला होणार गुणवंतांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा

कुडाळ –    सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबईतर्फे आयोजित ३१ वे जिल्हा स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा येत्या १८ जानेवारी २०२५ रोजी शिववर्धन, कुडाळ येथे होत आहे. या स्नेहसंमेलनात १० वी, १२ वी तसेच पदवीच्या उच्च श्रेणीतील विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

१० वीमध्ये ८५%, तर १२ वीमध्ये ७०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांबरोबर Engineering, Pharmacy, IT, Agriculture इत्यादी पदवी अभ्यासक्रमातील उत्कृष्ट गुणवंतांचाही या सोहळ्यात सत्कार केला जाणार आहे.

गौरव सोहळ्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असून विद्यार्थी आपल्या गुणपत्रिकेची प्रत समाज कार्यालयात जमा करू शकतात, असे संस्थेच्या सूचनेत म्हटले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : कार्यालय (९५२७७५४७०८) किंवा श्री. गोविंदराव (८३८०६०८८००).

संस्थेचे उपाध्यक्ष व स्थानिक समिती प्रमुख यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आर एल परब यांनी केले आहे.