किल्ले प्रवासी वाहतूक पूर्ववत सुरु

प्रवासी क्षमता दृष्टीने कडक निर्बंध मुळे काही काळ होती वाहतूक ठप्प : होडी व्यवसायिकानी वेधले होते

आमदार निलेश राणे यांचे लक्ष : अखेर सकारात्मक निर्णय : पर्यटकानीही व्यक्त केले समाधान

मालवण | प्रतिनिधी : मध्यप्रदेशातील जबलपूर येथे अलीकडेच झालेल्या दुर्दैवी बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीवर प्रवासी क्षमता दृष्टीने कडक निर्बंध लादले होते. मात्र, यावरून बंदर अधिकारी आणि होडी व्यावसायिक यांच्यात रविवारी वादाची स्थिती निर्माण झाली. प्रवासी होडी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.

दरम्यान याबाबत होडी व्यावसायिक यांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देणारे प्रवासी होडी वाहतूक व्यवसायिक यांच्या बाजूने आमदार निलेश राणे यांनी भूमिका मांडली. अखेर सकारात्मक निर्णय अंती किल्ले प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरु झाली. पर्यटक व किल्ले प्रवासी होडी वाहतूक व्यावसायिक यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. शिवराजेश्वर किल्ला प्रवासी वाहतूक यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले.

आज सकाळी मालवण बंदर विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक होडीतून पर्यटकांची संख्या निश्चित बाबत सांगितले. या निर्णयामुळे होडी व्यावसायिक यांच्यात संभ्रम निर्माण झाला. नियमानुसार पर्यटकांची सुरक्षा याबाबत काटेकोर पालन करणाऱ्या व्यवसायिकानी याबाबत बंदर अधिकारी यांच्याशी चर्चा केली. उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनीही होडी व्यवसाईकांची भुमिका मांडत आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. पर्यटकांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या प्रवासी होडी वाहतूक यांची भुमिका मांडण्यात आली. यां दरम्यान काही काळ प्रवासी होडी वाहतूक बंद राहिली. मोठया संख्येने आलेल्या पर्यटकांना याचा परिणाम झाला.

सकारात्मक चर्चे अंती पुन्हा प्रवसी होडी वाहतूक सुरु झाली. पर्यटकानीही याबाबत समाधान व्यक्त केले.