ओरोस व रानबांबुळी येथील मंदिरांच्या दान पेट्या फोडल्याने सिंधुदुर्गनगरी पुन्हा धास्तावली!

सिंधुनगरी | प्रतिनिधी

गेले अनेक महिने घरफोडीच्या भीतीपासून दूर असलेली सिंधू नगरी परिसर पुन्हा एकदा हादरून गेला आहे. महामार्गावरील भवानी मंदिर व रान बांबुळी गावातील मंदिरातील दान पेटी अज्ञातानी फोडल्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूण चार ठिकाणी देवस्थान मधील दान पेटी फोडून चोरट्याने डल्ला मारला असला तरी ओरोस पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत एकच गुन्हा दाखल झाला होता. या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली असून घटनास्थळावरून आरोपींचे फिंगरप्रिंट मिळविले आहेत.

तर सीसीटीव्ही फुटेज ही तपासले जात असून त्या आधारे आरोपीचा छडा लावू असा विश्वास ओरोस पोलिस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक कोल्हटकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला.रविवारी सकाळी ही घटना समजतात पोलीस दाखल झाले. मंदिरापासून रस्त्यापर्यंत श्वान पथकाने माघ दाखविला. त्यामुळे ओरोस पोलीस ठाण्यासमोर या तपासाचे मोठे आव्हान उभे आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील भवानी मंदिर सावंतवाडा येथील रहिवास असलेल्या ठिकाणी आहे. तर रानबांबुळी येथील तीन मंदिरे यांची फंडेपेटी फोडून दान केलेले रक्कम चोट्याने लंपास केली आहे. मजबूत असलेल्या या फंड पेट्या चोरट्याने शितापीने फोडल्या आहेत. ओरोस येथील भवानी मंदिरामध्ये फंडेपेटी फोडल्याची तक्रार दाखल झाली असून रानबांबुळी येथील फंदपेटी फोडण्याची तक्रार उशिरापर्यंत दाखल झाले नसल्याचे ओरोस पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.