रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील साठरेबांबर-ठोंबरेवाडी येथे जमाव करुन जामीन जागेच्या कारणावरुन ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित नऊ महिलांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.ही घटना रविवार 3 मे रोजी सकाळी 10.30 वा.सुमारास घडली आहे.
मेघना शरद मोघे (ता. जि. रत्नागिरी) इतर सात-आठ मुली व पुरुष (नाव गाव समजून येत नाही) असे संशयित आहेत.त्यांच्या विरोधात जयंत भार्गव पिपुटकर ( ६८, रा. साठरेबांबर ठोबरेवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना यातील संशयित महिला मेघना मोघे व त्यांच्या सोबत आलेल्या सात-आठ मुली व पुरुष असे नऊ जण जयंत पिंपुटकर यांच्या घराच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलगत असलेल्या कंपाऊंडमध्ये येवून तसेच त्यांच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश करुन जमीन जागेच्या कारणावरुन फिर्यादी पिंपुटकर यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जयंत पिंपुटकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.











