धनश्री जोशी मान्यवरांच्या उपस्थित सरपंचपदी विराजमान

शंकर वैद्य साखरपा:
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनश्री राजेंद्र जोशी या सोमवारी मान्यवरांच्या उपस्थित विराजमान झाल्या. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जोशी यांनी दुसऱ्यांदा सरपंचपदाच्या कार्याला सुरुवात केली. अत्यंत्य हुशार, प्रामाणिक, कार्यकर्तृत्ववान असे व्यक्तीमत्व असलेल्या धनश्री जोशी यांना सन्मानाने उपसरपंच श्रद्धा शेट्ये व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सरपंचपदाच्या खुर्चीत बसविले.यावेळी अनेकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मिळालेली संधी अल्पवधीची असली तरी या कालावधीत पारदर्शक कारभार करणार असल्याचे सत्काराला उत्तर देताना जोशी यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी जोशी यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला वर्ग, जेष्ठ नागरिक,असे बहुसंख्येने उपस्थित होते.