पाच जणांच्या टोळक्याचा जीवघेणा हल्ला
पूर्ववैमनस्यातून हत्येची शक्यता, आरोपी ताब्यात
सोलापूर शहरात भरदिवसा झालेल्या एका निर्घृण हत्येने परिसर हादरला आहे. 70 फूट रस्त्यावर पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला करून त्याचा खून केला. सुरेश श्रीराम असे मृत तरुणाचे नाव असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या पूर्वीच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सोलापूर : शहरातील 70 फूट रस्त्यावर भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुरेश श्रीराम असे मृत तरुणाचे नाव असून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
माहितीनुसार, आरोपींनी सुरेशची गाडी अडवून त्याच्यावर दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याला प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही आणि काही क्षणांतच त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मृत आणि आरोपींमध्ये आधीपासून वाद असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरितांचा शोध सुरू आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कालच सोलापुरात तिहेरी हत्याकांडाची घटना घडल्याने कायद्याच्या सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडून या घटनांचा सखोल तपास सुरू आहे.










