ओटवणे (प्रतिनिधी ) श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये या प्रशालेचा यावर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के एवढा लागला असून प्रशालेतून यावर्षी तेरा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये कुमारी पूर्वा न्हानु सावंत हिने 89.40% एवढे गुण मिळवत प्रशालेतून पहिला येण्याचा मान पटकावला, किशोरी राजेंद्र गावकर गावकरहिने 84.80% गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर अभिषेक धाकू कोळापटे याने 81.20% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवीला.या विधार्थ्यांनी आपल्या प्रशालेच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत तसेच शिक्षकवृंद, स्कूल कमिटी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.












