मसुरे | झुंजार पेडणेकर :ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला.
ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेतून दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात लाजरी मिलिंद कांदळगांवकर हिने ९१.४० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला.
द्वितीय अस्मि प्रवीण पारकर हिने ९१.२० टक्के, तृतीय रोहित रणजित परब याने ७७.८० टक्के गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सचिव जी.एस. परब, खजिनदार शरद परब व सर्व संचालक, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे व सर्व सदस्य, माजी सभापती उदय परब, ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.












