अथर्वा दिलीप खेगडे ९७.८० टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम
लांजा (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल लांजाचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.१९ टक्के लागला असून अथर्वा दिलीप खेगडे हिने ९७.८० टक्के गुणांसह प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला.
न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल लांजाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून प्रशालाने ९६.१९ टक्के गुणांसह आपला नावलौकिक कायम राखला आहे.
दहावी परीक्षेत अथर्वा दिलीप खेगडे हिने ९७.८० टक्के गुणांसह प्रथम, आर्या अमित फणसळकर हिने ९७.४० टक्के गुणांसह द्वितीय तर सचिन मनोज साह याने ९५.२० टक्के गुणांसह प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला.
दहावी परीक्षेसाठी प्रशालेतून २८९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशाळेचा एकूण निकाल ९६.१९ टक्के लागला आहे
इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६६ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता धारण केलेली आहे.तर प्रथम श्रेणी ९२ व द्वितीय श्रेणी ९२ विद्यार्थ्यांनी धारण केलेली आहे.












