भरतगड इंग्लिश मीडियमचा अथर्व कुशे मसुरे केंद्रात प्रथम !

 

▪️विराज परब केंद्रात दुसरा.

मसुरे | झुंजार पेडणेकर भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डेचा इयत्ता दहावी चा निकाल 100% लागला असून अथर्व अमित कुशे 95.60 % गुण मिळवून प्रथम आला आहे. तर द्वितीय विराज विश्वनाथ परब 94.20 %, तृतीय क्रमांक निधी समीर पेडणेकर 90.80% आणि यश हरेश तेंडोलकर (90.80%) तसेच चौथा क्रमांक विजय बाबाजी मेस्त्री 90.00%, मंथन नारायण राणे 89.00% पाचवा आला आहे. अथर्व अमित कुशे याने मसुरे केंद्रात प्रथम क्रमांक तसेच गणित या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत .तर विराज विश्वनाथ परब याने केंद्रात द्वितीय क्रमांक पटकवला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे,तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचारी यांचे

शाळेचे संस्था अध्यक्ष श्री. प्रकाश परब, उपाध्यक्ष संजय परब, स्कूल कमिटी चेअरमन संग्राम प्रभूगावकर ,संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, संस्था सचिव अशोक मसुरेकर, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुंबई कमिटी सदस्य, ग्रामस्थ, पालक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे .