१००% गुण मिळवून सान्वी रघुनाथ कारेकर तालुक्यात प्रथम
कणकवली : कणकवली तालुक्यातील १ हजार ४३६ विद्यार्थ्यानी माध्यमिक शालांत परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७५३ मुले व ६८३ मुलींचा समावेश होता. १ हजार ४३६ पैकी १ हजार ४०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ७३० मुले व ६७७ मुलींचा समावेश आहे. तालुक्याचा निकाल ९७. ९८ लागला आहे. तर तालुक्यातील २० विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. कणकवली तालुक्यात विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीची सान्वी रघुनाथ कारेकर ही १००% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर एस. एम. हायस्कूलची पूर्वा संतोष सावंत व फोंडाघाट हायस्कूलची सेजल सखाराम हुंबे या दोघी ९८.८०% गुण मिळवून द्वितीय तर आयडियल इंग्लिश स्कूलची लिशा रुपेश जाधव ही ९८.६०% गुण मिळवून तालुक्यात तृतीय आली आहे.
कणकवली तालुक्यातील विद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे –
१). विद्यामंदिर हायस्कूल हरकुळ खुर्द प्रशालेतून २४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. प्रशालेचा निकाल १००% लागला असून प्रशालेत प्रथम कु. अदिती सुभाष रासम ( ९६%) गजन मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. द्वितीय कु. आर्या भिकाजी रासम ( ९५.८०%) व तृतीय कु. गौरी प्रशांत घाडीगांवकर ( ९१.६०%) गुण मिळवून तृतीय आली आहे.
२). शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव चा निकाल १००% लागला असून २० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. प्रशालेत कु. दुर्वेश यशवंत सावंत ( ८९%) याने गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर मैथिली मिलिंद कदम (८४%) गुण मिळवून द्वितीय आली आहे. तर कु. सेजल बाळकृष्ण शिवडावकर (८२.२०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
३). सरस्वती हायस्कूल नांदगाव प्रशालेतून ७० मुले परीक्षेला प्रविष्ठ झाली होती. प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. कु. आदिती अजय चाळके (९०.२०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. मृणाली मारुती मोरये (८८%) गुण मिळवून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. आदिती अवधूत चाळके (८७.२०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
४). विद्यामंदिर हायस्कूल लोरे वाघेरी प्रशालेचा निकाल १००% लागला असून प्रशालेतून १८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रशालेतून कु. समर्थ प्रशांत राणे (८८.८०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. राज वसंत मांडवकर (८५.६०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला असून कु. राहुल महेश पाटील (८३.६०%) गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
५). एस. एम. हायस्कूल कणकवली कु. पूर्वा संतोष सावंत(९८.८०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. कु. मुग्धा विकास साईल (९७.८०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. मनाली प्रसन्ना देसाई (९७%) गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
६). अंजुमन – इ – खुद्दमुल मुस्लीमीन हायस्कूल हरकुळ बुद्रुक प्रशालेचा निकाल १००% लागला असून १६ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. प्रशालेत कु. हुसेन शेख(९३.२०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. रुक्सार साठी हिने (९२.४०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु. तमन्ना पटेल (८७.६०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
७). कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे प्रशालेचा निकाल ९७.०९% लागला असून प्रशालेतून १०७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यामध्ये कु. अद्विता महावीर पोकळे (९३%) गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून कु. प्रणव लवू दहिफळे (९२.४०%), कु. अथर्व सत्यविजय सावंत (९२.४०%), कु. रिया विश्वनाथ सावंत (९२.४०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु. सर्वेश सतीश कदम याने ( ९०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
८). नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ, हायस्कूल प्रशालेत ५८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रशालेचा निकाल १००% लागला. यामध्ये कु. हर्षदा महेश वर्दम (९५%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. नेहा भिकाजी सावंत (९१.४०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कु. भार्गवी देवेंद्र कर्णिक (८९.८०%) गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
९). नरडवे इंग्लिश स्कूल, नरडवे प्रशालेचा निकाल १००% लागला असून प्रशालेतून एकूण १८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. कु. तन्वी महेश मेस्त्री (८८.८०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. आशिष लक्ष्मण सावंत ( ८७.२०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर कु. वेदा संजय सावंत (८३.६०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
१०). वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ महादेव. वि. केसरकर हायस्कूल ने १४ वेळा १००% निकालाची परंपरा जपली आहे. कु. आर्यन सुधाकर कुळकर्णी (९२.२०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. दीपेश संतोष पाष्टे (८९.८०%) मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर कु. मयुरेश महेश प्रभू ( ८९.६०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
११). वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय प्रशालेचा निकाल ९५.९१% निकाल लागला आहे. कु. स्वयंम मिलिंद महाडिक (८८.२०%) गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. कु. शुभम महेश तेली (८७.४०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर कु. अथर्व संतोष जठार (८४.२०%) गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
१२). लक्ष्मीबाई गोपाळ सावंत विद्यालय हरकुळ बुद्रुक चा निकाल ९४.७४% लागला आहे. कु. दुर्वी नित्यानंद चिंदरकर (९०.६०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. धनश्री प्रवीण कांदळकर (८६.६०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु मुग्धा सुधीर वर्देकर ( ८५.४०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
१३). विद्यामंदिर हायस्कूल कणकवली प्रशालेचा निकाल ९८.१७% लागला आहे. कु. सान्वी रघुनाथ कारेकर (१००%) गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर कु. समृद्धी शंकर धुरी (९८.२०%), कु. चिन्मयी सुहास गुरव (९८.२०%), कु. गौरी सुनील खोचरे (९८.२०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कु. वरदा दत्तप्रसाद मराठे (९७.२०%) गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
१४). आदर्श विद्यामंदिर सावडाव प्रशालेचा निकाल १००% निकाल लागला आहे. कु. प्राजक्ता साईनाथ डगरे (८३.४०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. पूर्वा बाजीराव डगरे (८१.४०%) गुण मिळवून द्वितीय व कु. वैष्णवी अरविंद तेली (७३%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
१५). माध्यमिक विद्यामंदिर कनेडी चा निकाल १००% लागला आहे. ७४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. कु. अथर्व गंगाराम तांबे ( ९५.२०%) गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. कु.रिद्धी रविकांत पेंडुरकर (९४.२०%) मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर आर्या प्रदीप सावंत (९२.८०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
१६). न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट चा निकाल ९९.०२% लागला आहे. परीक्षेत १०२ विद्यार्थी प्रविष्ठ १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कु. सेजल सखाराम हुंबे ( ९८.८०%) गुण मिळवून प्रथम कर्मनाक मिळवला आहे. तर कु. दीक्षा अशोक सामंत ( ९६.४०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कु. वेदांत प्रदीप तावडे ( ९४.८०%) गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
१७). सेंट उर्सुला स्कूल, वरवडे चा निकाल १००% लागला असून ८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यामध्ये कु. सोनिया विलास चोडणकर (९८%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु.निल चेतन नलावडे (९७.८०%) गुण मिळवले आहेत. तर कु. श्राव्य विनायक मेस्त्री (९७.६०%), कु. आराध्या सुशील सावंत ( ९७.६०%) मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
१८). शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण चा निकाल ९७
१६% लागला असून १०७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कु. संस्कृती संजय भोर (९३.४०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. आर्या विजय गुरव (८९.८०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. कु. प्राजक्ता ठाकुरदेसाई (८८.८०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
१९). विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली चा निकाल १००% लागला आहे. प्रशालेतून एकूण ८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. कु. यज्ञेश किरण गावडे (९१.२०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. पूर्वा ओमप्रकाश रावले ( ९०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. पूजा संतोष उंबळकर (८५.८०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२०). आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडेमध्ये कु. लिशा रुपेश जाधव (९८.६०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. सुश्रुत मंदार नानल (९८.२०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. खुशी विशाल आमडोसकर (९६.६०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२१). तांबे एज्युकेशन सोसायटी आदर्श विद्यालय करंजे विद्यालयात कु. वंदना अरविंद सावंत (९४.४०%) प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. अथर्व राजेंद्र सावंत (९४.२०%) गुण मिळवून द्वितीय तर कु. पायल उत्तम शिरसाठ (९२%) गुण मिळवून तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
२२). न्यू इंग्लिश स्कुल ओसरगाव – बोर्डवे प्रशालेत कु. गणेश दीपक शिंदे (७४.६०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु. स्वानंदी सुनील कदम (७४.२०%) गुण द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर कु. सृष्टी महेश सावंत (७०.४०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२३). शंकर महादेव विद्यालय कुंभवडे विद्यालयाने २४ वर्ष १००% निकालाची परंपरा जपली आहे. कु. खुशी गोसावी (८७%) गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. राजदीप तेली (८०.४०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर कु. जयेश आचरेकर (७७.२०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२४). कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. कु. भूषण प्रमोद दळवी याने (९३.६०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. मेघा प्रवीण दळवी हिने (८९.६०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तर कु. मयुरेश सुरेश धुरी (८९.%) व कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री (८९%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२५). माध्यमिक विद्यामंदिर नाटळ चा निकाल (९५.५५%) लागला आहे. प्रशालेत कु. वैदिका संतोष सावंत (९१.६०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. इशा दयानंद घाडीगांवकर(८८%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहेत. तसेच कु. श्रावणी पांडुरंग सावंत (८५%) मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२६). बाल शिवाजी इंग्लिश स्कूल मधून कु. गार्गी अरुण राणे याने (७५.८०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. आराध्य विठ्ठल राणे याने (७४%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून कु. तनुजा सागर जाधव हिने (७२.२०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२७). नॅशनल इंग्लिश स्कूल नडगिवे प्रशालेतून कु. मदिहा सटकूट हिने (९३.६%) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. नबिहा काझी हिने (९२.२%) मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. शमिका निग्रे हिने (८९.२%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
२८). माध्यमिक विद्यालय बिडवाडी प्रशालेतून २४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. प्रशालेचा निकाल १००% लागला असून कु. केतन संजोग भोगले ( ८७.४०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. सांची संदीप तांबे (८४%) गुण प्राप्त केले आहेत. तसेच कु. तन्वी सागर वायंगणकर हिने (८०.२०%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
२९). माध्यमिक विद्यालय शेर्पे चा निकाल जाहीर झाला असून कु. जय सुभाष देवधर याने (८०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. कुणाल बळीराम गोसावी (७८.६०%), कु. श्रुती सदाशिव कुडाळकर (७८.६०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. गणेश अनिल जाधव याने (७७.४०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
३०). अ.वि फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. प्रशालेतून एकूण १८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कु. पार्थिवी दीपक एकावडे (९४%) गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. काजल पांडुरंग दिवेकर हिने ( ८४.६०%) गुण प्राप्त केले आहे. तसेच कु. वैष्णवी संतोष भोपळे हिने (७७.८०%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.













