पेठकिल्ला येथील एका लाकडी बाकावर आढळला कामगाराचा मृतदेह

dead

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील पेठकिल्ला येथील एका लाकडी बाकावर आसाममधील कामगाराचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवार 7 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप दास (40,मुळ रा.आसाम सध्या रा.पेठकिल्ला,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. दिलीप दास हा गेल्या 20 वर्षांपासून रत्नागिरीत रहात होता. तो पेठकिल्ला येथील बोट बांधण्याच्या ठिकाणी तसेच इतर बारिक-सारिक कामे करुन आपला उदरनिर्वाह चालवायचा. सोमवारी सकाळी दिलीप पेठकिल्ला येथीलच एका लाकडी बाकावर निपचित पडलेला दिसून आल्यावर आजुबाजुच्या नागरिकांनी त्याला 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.