अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथेअकरावीच्या प्रवेशासाठी विनामूल्य विद्यार्थी समुपदेशन केंद्र कार्यान्वित !

रत्नागिरी :
अभिनंदन! अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे अकरावीच्या प्रवेश नोंदणीसाठी समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ विनामूल्य भरून देण्यासाठी सदर समुपदेशन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
​दि. ११ मे २०२६ पासून महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील भौतिकशास्त्र विभागात सकाळी १०.०० ते दु. १.०० या वेळेत विनामूल्य सुविधा देण्यात येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला व बोर्ड मार्कशीट उपलब्ध झाल्यावर दि. १८ मे २०२६ पासून प्रवेश अर्जाचा भाग- २ भरून देणे आणि Preference कॉलेज निवडण्यास मदत करणे अशी सुविधा विद्यार्थ्यांना या समुपदेशन केंद्रातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल.
​अधिक माहितीसाठी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. मकरंद दामले मोबा. ९४२११४३३४३; पर्यवेक्षक प्रा. व्ही. टी. केळकर मोबा. ९४२११४३३०४; उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी गोसावी मोबा. ९३७०३८६९९१/ ७०५७३७४०७५ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.