रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरानजीकच्या मिरजोळे नाखरेकरवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी दारुची विक्री करणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई रविवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1.40 वा.करण्यात आली.
सुनिल सदाशिव जाधव (50,रा.बौध्दवाडी मिरजोळे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.रविवारी दुपारी शहर पोलिस नाखरेकरवाडी परिसरात गस्त घालत असताना त्यांना त्याठिकाणी असलेल्या नदीच्या किनारी झाडी-झुडपात संशयित हा गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना दिसून आला.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











