12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण, 28 ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण
एकाच महिन्यात दोन ग्रहणांमुळे खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता
2026 हे वर्ष खगोलीय घटनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने दोन मोठ्या ग्रहणांचा अनुभव मिळणार आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार असून, 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. एकाच महिन्यात सलग दोन ग्रहण होणार असल्याने खगोलप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या दुहेरी खगोलीय घटनेमुळे विज्ञानविश्वातही विशेष चर्चा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली : खगोलशास्त्राच्या दृष्टीने 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, ऑगस्ट महिन्यात अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने दोन मोठ्या ग्रहणांची नोंद होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट 2026 रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.
एकाच महिन्यात दोन ग्रहण होण्याची ही घटना खगोलशास्त्रज्ञांसाठी तसेच आकाश निरीक्षण करणाऱ्या उत्साही लोकांसाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. या दुहेरी खगोलीय घटनेमुळे जागतिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.
खग्रास सूर्यग्रहणादरम्यान सूर्य पूर्णतः झाकला जातो, तर खंडग्रास चंद्रग्रहणात चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो. या दोन्ही घटनांचा अभ्यास वैज्ञानिकांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.










