कोल्हापुरात मसाज पार्लरवर छापा… 

वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे :कोल्हापूर: शहरातील कपिलतीर्थ मार्केट परिसरातील साई मसाज पार्लर ठिकाणी वेश्या व्यवसायावर जुना राजवाडा पोलिसांनी छापा टाकून कोण मोठे कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी लोकसह अडतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमात जप्त केला असून एका महिन्याची सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.किरण लोंढे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ९ मे रात्री साडेआठ’च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

आरोपी हे गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करून घेत होते.

आरोपी शुभांगी चंद्रकांत साळुंखे (वय.४५,रा.फुलेवाडी) व योगेश दत्तात्रय ढवळे (वय ३२, रा.बारामती,सध्या कोल्हापूर) यांना अटक केली आहे.भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२), ३,(५) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५ व ७ नुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नील ओत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण लोंढे, उपनिरीक्षक महेश पाटील, अभिजीत भोर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.