रत्नागिरी : जिल्ह्यात जनगणना 2027 चे काम सुरु झाले आहे. सर्व नागरिकांनी या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि स्वगणाना करताना ॲपमध्ये अचूक माहिती द्यावी. तसेच यानंतर होणाऱ्या घरयादी आणि घरगणना प्रक्रियेमध्ये प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
ते म्हणाले, जिल्ह्यात जनगणना 2027 चे काम सुरु झाले आहे. यासाठी 2791 प्रगणक गट आणि त्यांचे सुमारे 3085 प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचारी कार्यरत केलेले आहेत. आपण जी जनगणना करतोय ती दोन टप्प्यामध्ये पार पडणार आहे. यामध्ये 1 मे ते 15 मे या दरम्यान स्वगणना ही प्रक्रिया आपण राबविणार आहोत. दि. 16 मे ते 14 जून यामध्ये प्रत्यक्ष घरयादी व घर गणना याचे काम करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनगणनेचा काम आपण डिजीटल पध्दतीने करत आहोत. त्यामध्ये एचएलओ हे एक मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर एकूण 33 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. सर्व नागरिकांनी ते अचूक प्रमाणे सर्व माहिती आपली द्यावी. डिजीटल प्रणालीद्वारे जे सर्व्हेक्षण करतो आहोत, त्यामध्ये सिक्युरिटीचे फीचर्स उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.













