तालुका पंचायत समिती कार्यलयाची पाणीटंचाईतुन कायमची सुटका

उपसभापती अभिजित गुरव यांचे सुयोग्य नियोजन व यशस्वी कामगिरी
राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार करून त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पंचायत समितीच्या कार्यालयालाच वर्षानुवर्ष पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र उपसभापती अभिजित गुरव यांनी यावर यावर सुयोग्य असे नियोजन करत यशस्वी तोडगा काढला आहे. लगतच असलेल्या कोदवली व हर्डी गावतून जाणाऱ्या नदीचे पाणी पंपाच्या साह्याने थेट पंचायत समितीत आणून पंचायत समितीची पाणीटंचाई कायमची दूर केली आहे. गुरव यांनी केलेल्या या कामाचे कौतुक होत असून लोकप्रतिनिधींनी दुरदृष्टी ठेऊन कशा प्रकारे काम केले पाहिजे याची झलक गुरव यांनी दाखवून दिल्याची चर्चा पंचायत समिती वर्तुळात होत आहे.
राजापूर तालुका पंचायत समितीच्या माध्यमातुनच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचे टंचाई कृती आराखडे तयार केले जातात, याच कार्यालयातुन तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचा कारभार हाकाला जातो. तालुक्याच्या ग्रामीण भागाचे सत्ताकेंद्र अशी पंचायत समितीची ओळख आहे. मात्र गेले अनेक वर्ष  गाव आणि वाडयांना पाणीपुरवठा करणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाला मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.राजापूर नगर परिषदेचे नळ संयोजन पंचायत समितीत आहेत, पण टंचाई काळात या नळांना पाणीच येत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे याचा फटका पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी वर्गाला बसत होताच पण ग्रामीण भागातुन येणारी जनता  खास करून महिला वर्ग यांना याचा फटका बसत होता. तर लोकप्रतिनिधींनाही याचा फटका बसत होता. आवारातील शौचालयातही पाणी नसल्याने महिला वर्गाचीही मोठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे नाराजीचाही सुरू होता.
अनेकांनी याबाबत उपसभापती अभिजीत गुरव यांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली होती.  गुरव यांनी याची दखल घेत तात्काळ गटविकास अधिकारी  संतोष म्हेत्रे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत पोवार यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली व यावर तातडीने मार्ग काढण्याच्या सुचना दिल्या. यासाठी तात्काळ अंदाजपत्रक तयार करा असेही निर्देश गुरव यांनी दिले. आपल्याच भागातुन  कोदवली व हर्डी गावातुन जाणाऱ्या नदीचे पाणी पंपाच्या साह्याने पंचायत समितीतीमध्ये आणणे शक्य असल्याचे गुरव यांनी सांगितले. यासाठी अधिकाऱ्यांसोबत त्यांनी प्रत्यक्ष पहाणी केली व याबबात अंदाजपत्र तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या.
यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून  अंदाजे १५ लाख रुपये खर्च येईल असे अंदाज पत्रक तयार करण्यात आले होते. मात्र गुरव यांनी यामध्ये जातीनिशी लक्ष घालुन कमीत कमी खर्चता कशा प्रकारे पाणी पंचायत समितीत आणता येईल यासाठी पुन्हा चर्चा केली व कपात करून अवघ्या चार लाख रूपये खर्चात   भागातुन  कोदवली व हर्डी गावातुन जाणाऱ्या नदीचे पाणी पंपाच्या साह्याने पंचायत समितीतीमध्ये आणले आहे. तातडीने ही कार्यवाही व काम करत पंचायत समिती आवारात पाणी आणण्यात गुरव यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आज पंचायत समितीत मुबलक पाणी आले असून यामुळे अधिकारी, कर्मचारी वर्ग व जनतेलाही दिलासा मिळाला आहे.
लोकप्रतिनिधींनी दुरदृष्टी ठेऊन काम केले तर नक्कीच सकारात्मक बदल आणि काम होऊ शकते हे गुरव यांनी या कामातुन दाखवून दिले आहे. तालुक्याला टंचाईमुक्त करण्याचे नियोजन करणारे पंचायत समिती कार्यालयच टंचाईचा सामना करत असेल तर कसे होणार हे लक्षात घेऊन हे कार्यालय पहिले टंचाईमुक्त केले पाहिजे हा दृष्टीकोन ठेऊन गुरव यांनी पंचायत समिती कार्यालय कायमचे टंचाईमुक्त केले आहे. प्रशासनाकडून योग्य पध्दतीने तोडगा काढून कुठलेही काम योग्य पध्दतीने करू शकतो व होऊ शकते हे देखील यातुन गुरव यांनी दाखवून दिले आहे. अत्यंत कमी वेळात योग्य पध्दतीने गुरव यांनी यासाठी नियोजन करून पंचायत समितीच्या आवारात पाणी आणल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.