आवळदेवाडी मसदे येथे 12 रोजी रक्तदान शिबीर!

मसुरे | झुंजार पेडणेकर :     आवळदेवाडी ग्रामस्थ मंडळ, मसदे यांच्या वार्षिक सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आज १२ मे रोजी मसदे आवळदेवाडी बस स्टॉप मसदे पेट्रोल पंपा जवळ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९.०० ते २.०० वा. :

रक्तदान शिबिर,दुपारी २.०० वा. : श्री सत्यनारायण पूजा,

सायं ६.०० वा. : आरती व तीर्थप्रसाद, सायं ७.०० वा.: हळदीकुंकू,

रात्री ८.०० वा. महाप्रसाद,रात्री ठीक ९.०० वा. : स्थानिक भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.