माहितीच्या अधिकारात माहिती मिळण्यास टाळाटाळ कि माहिती लपवीली जाते – संतोष पोटफोडे

साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

शंकर वैद्य साखरपा:
पस्तीस दिवस झाले तरी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते, कि माहिती दडपली जाते, कि सत्य बाहेर येईल याची भीती वाटतेय असे संतप्त व आक्रमक मत पत्रकार संतोष पोटफोडे यांनी व्यक्त केले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागून ३५ दिवस झाले तरी माहिती मिळण्यास टाळाटाळ केली जाते. कि आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी टाळाटाळ केली जाते. याचा अर्थ माहिती अधिकार कायदा पायदळी तुडवणाऱ्या व माहिती देण्यास आकार्यक्षम असणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून संबंधित अधिकाऱ्याला दररोज २५०/- रुपये प्रमाणे दंड करण्याची मागणी पोटफोडे यांनी केली आहे. दहा दिवसापूर्वीच साखरपा येथे महाराष्ट्र शासनाने राबविलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी व सुपरवाझर तथा माहिती अधिकार अधिकारी उपस्थित होते. मोठ्या दिमाखात साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात लावलेली पाटी शोभेचे बाउले बनले असून ती पाटी तरी हटवावी. जर सर्व सामान्यांना माहिती मिळण्यास असमर्थ असतील तर अशा अधिकाऱ्याची हकालपट्टी करून कारभार सुधारण्याची गरज आहे. कोणी कधीही या आओ जाओ घर तुम्हारा या उक्ती प्रमाणे काही कर्मचारी वागत आहेत. कोणाचे नियंत्रण नाही. सार्वजनिक ठिकाणी शिबीर असो अथवा शासकीय कार्यक्रम असो अशा कार्यक्रमात गोडवा गायचा आणि स्वतःची पाठ स्वतः थोपटायची अशी सवय लागली आहे. याबाबतीत तालुका वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात चाललेल्या प्रकारची माहिती दिली. मात्र कारवाई सोडाच आणि सुधारणाही सोडा मात्र एकमेकांना वाचावीण्याचाच प्रकार सुरु आहे. याबाबतीत जिल्हा प्रशासनाकडे व मंत्र्याकडे लेखी तक्रार करणार असून सत्य बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे संतोष पोटफोडे यांनी संतप्तपणे सांगितले. तर अन्य माहिती काही दिवसात सादर करणार असल्याचे देखील सांगितले.