देवगड : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा रूग्णालयात अॅडमिट असलेल्या जावयाचा सोबतीस राहीलेले उमाजी आत्माराम तोडणकर(७५) रा.मिठमुंबरी खालचीवाडी यांचा ह्दयविकाराच्या तीव्र धक्कयाने रूग्णालयातच मृत्यू झाला.ही घटना १२ मे रोजी पहाटे १.३० वा.सुमारास घडली.या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मिठमुंबरी खालचीवाडी येथील उमाजी तोडणकर यांचे जावई मंगेश गावकर यांची तब्येत बरी नसल्याने ते जिल्हा रूग्णालयात अॅडमिट होते. त्यांना पाहण्यासाठी उमाजी तोडणकर हे जिल्हा रूग्णालयात गेले होते.१२ मे रोजी पहाटे १.३० वा.सुमारास ते मंगेश गावकर यांच्या सोबत होते.यावेळी उमाजी तोडणकर यांच्या अचानक छातीत दुखून त्यांना चक्कर येवून ते जमीनीवर कोसळले.त्यांना तेथिल वैद्यकीय अधिकाèयांनी तपासून ते मयत झाल्याचे घोषित केले.या घटनेची फिर्याद मुकूंद विष्णू गावडे(३६) रा. पिंगुळी नवीवाडी कुडाळ यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.या घटनेचा तपास महिला पोलिस हवालदार विनीता भुजे करीत आहेत.













