आंबडपाल येथील श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमीत गुरुवारी श्री सत्यनारायण महापूजा; नाथ भक्तांना उपस्थितीचे आवाहन

कुडाळ तालुक्यातील आंबडपाल (अडूळ) येथील प्रसिद्ध श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी (देवाचा डोंगर) येथे गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री नवनाथ ग्रंथात वर्णन असलेली ही पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथांनी कालिका अष्टाच्या सहाय्याने शाबरी विद्या पूर्णत्वास नेली तसेच तीन दिवस तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व नाथ भक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.