राजेंद्र शेर्लेकर यांचे निधन

बांदा : प्रतिनिधी
शेर्ले – शेटकरवाडी येथील राजेंद्र गोविंद शेर्लेकर (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी निधन झाले. एसटी महामंडळाच्या सावंतवाडी आगाराचे ते निवृत्त वाहतूक नियंत्रक होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते गौरांग शेर्लेकर यांचे ते वडील होत.