वेंगुर्ले : प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मूल्यमापनसाठी मूल्यमापन समितीने वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीला भेट दिली व अभियान अंतर्गत परिक्षण केले. यावेळी समितीमध्ये भोर गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, विस्तार अधिकारी विलास कोळी, प्रदिप ढवळे, सागर कुडले यांचा सामावेश होता. प्रथम ग्रामपंचायत मध्ये त्यांचे सरपंच संतोष गावडे यांनी स्वागत केले.
यावेळी कृषी अधिकाशी श्री. सावंत, कोरगांवकर, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, प्रवीण नेमण, आनंद परुळेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपसरपंच मिलिंद गावडे, ग्रा.पं.सदस्य प्रणित सावंत, सुलोचना परब, सुहासिनी वैद्य, रंजना, दिपक कवठणकर, निलेश नाईक, समिक्षा तांडेल उपस्थित होते. यावेळी आरोग्य विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा सेविका, सर्व शाळा शिक्षक, सीआरपी , ग्रामसंघ पदाधिकारी, महिला बचतगट सदस्य, ग्रामपंचायत समिती सदस्य, महिला ग्रामस्थ,पोलीसपा टील श्रद्धा वैद्य, शाम नेमण, ग्रामपंचायत कर्मचारी वैशाली नाईक, घनश्याम नाईक, अंकुश गावडे आदी उपस्थित होते. सरपंच संतोष गावडे यांनी समितीला अभियान अंतर्गत माहिती दिली. समितीने मंदिर परिसर, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, व्यायामशाळा, नळयोजना, पाणी साठवण बंधारे, सांडपाणी व्यवस्थापन आदी ठिकाणी भेट देत पाहणी केली व समाधान व्यक्त केले.












