वेंगुर्ले शहरातील लकी स्टोअर ते रामेश्वर मंदिर दरम्यान गटाचे बांधकाम धीम्या गतीने सुरू..

मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी : सर्वसामान्यांचे हाल

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले सावंतवाडी या मुख्य मार्गावरील वेंगुर्ले शहरातील लकी स्टोअर ते रामेश्वर मंदिर दरम्यान गटाचे बांधकाम सुरू असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ट्रॅफिक पोलिस किंवा नगरपरिषद प्रशासनाकडून ठेकेदाराचा कुणी व्यक्ती वाहने सोडवण्यासाठी नसल्याने सर्वसामान्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपरिषद प्रशासनाकडून हे गटाराचे बांधकाम ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. मात्र काम धीम्या गतीने सुरू असल्याने आणि नगरपरिषद प्रशासनाचा एकही अधिकारी कामावर लक्ष ठेवण्यासाठी उपलब्ध नाही. आज तुळस येतील मोठा जैतिर उत्सव असल्याने भाविकांची या मार्गावर वाहने घेऊन गर्दी वाढत आहे. त्या भाविकांना तसेच वेंगुर्ले बाजारात बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. तरी नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वेंगुर्ले वासीयांकडून होत आहे.