प्रकल्पग्रस्तांसाठी आदर्श पुनर्वसन गावठाण उभारणार : पालकमंत्री नितेश राणे

विकासकामांचे श्रेय पाठपुरावा करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न ही मार्गी लावणार

भोम येथील नूतन बुद्धविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लोकार्पण सोहळा नाम. नितेश राणे यांच्या शुभहस्ते संपन्न  

वैभववाडी l प्रतिनिधी :      अरुणा प्रकल्प पुनर्वसन गावठाण मध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत. याचे संपूर्ण श्रेय विकासकामाचा पाठपुरावा करणाऱ्या जनतेचेच आहे. प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्न मार्गी लावून आदर्श पुनर्वसन गावठाण करणार असे प्रतिपादन मत्स्योद्योग मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

भोम पुनर्वसन येथे उभारण्यात आलेल्या बुद्धविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक नूतन वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा व महामानवांचा जयंती महोत्सव पार पडला. भोम बौद्ध विकास मंडळ मुंबई व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जि. प. सदस्य प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, साची कोलते, प्रकाश पाटणकर, दिलीप तळेकर, बंड्या मांजरेकर, प्राची तावडे, डॉ. जगन्नाथ जामदार, शारदा कांबळे, सुवर्णा संसारे, राजेंद्र राणे, विजय तावडे, महेश संसारे, यशवंत कांबळे, अध्यक्ष यशवंत कांबळे, शिवाजी कांबळे, चंद्रकांत कांबळे, काशिनाथ कांबळे, सुरेश कांबळे, मारुती कांबळे, अभय कांबळे, अमित कांबळे, बाळकृष्ण कांबळे, भास्कर कांबळे, अनंत कांबळे, सिद्धार्थ कांबळे, आकाराम नागप, यशवंत नागप, विश्वनाथ नागप, व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन भागात आलो आहे, की कुठच्या मोठ्या शहरात आलो आहे. असा भास होत आहे. कारण इथल्या नागरी सुविधा शासनाच्या वतीने दर्जेदार झाल्या आहेत. पुनर्वसन भागाचा जो बदल दिसतो आहे, तो कसा झाला. त्यासाठी काय काय करावं लागलं, याचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. परंतु झालेला विकासात्मक बदल हा प्रकल्पग्रस्त व नागरिकांच्या पाठपुराव्यामुळेच झाला आहे. भोम पुनर्वसन मध्ये आज सुसज्ज बुद्धविहार इमारत व स्मारक उभे राहिला आहे. हे बुद्धविहार जनतेसाठी व युवकांसाठी निश्चित प्रेरणास्थान ठरेल. भविष्यात जे जे प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी तुमचा पालकमंत्री सक्षम आहे. लवकरच जिल्हाधिकारी व खात्याचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत पुनर्वसन मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येईल. व उर्वरित प्रलंबित विकास कामे ही मार्गी लावली जाते असे सांगितले.

बुद्ध विहाराच्या नूतन वास्तूचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर मूर्तीचे उद्घाटन प्रकाश पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितेश राणे यांचा मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभय कांबळे यांनी मानले. यावेळी शारदा कांबळे भालचंद्र साठे यांनी मनोगत व्यक्त केले.