विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही
उपळे डांगेवाडीत साई भंडाऱ्याला नामदार नितेश राणे यांची उपस्थिती
साई मंदिराचा सभामंडप उभारल्याबद्दल नितेश राणे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
वैभववाडी l प्रतिनिधी : गावच्या सर्वांगीण विकासाबरोबर जनतेची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे. दिलेला शब्द पूर्ण करणे, अशी शिकवण आमच्यावर आहे. यापुढे देखील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
उपळे डांगेवाडी येथील सिद्ध साई सेवा मंडळ आयोजित येथील साई मंदिरात सत्यनारायण महापूजा व साई भंडारा पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. सिद्ध साई सेवा मंडळ यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षी याच मंदिरात नितेश राणे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. साई मंदिराचा सभा मंडपाचा विषय मार्गी लावणार असा शब्द नितेश राणे यांनी येथील भाविकांना दिला होता. काही महिन्यातच या ठिकाणी सभामंडप पूर्ण झाले आहे. या सभा मंडपाचा पुरेपूर वापर भाविक व ग्रामस्थांना होत आहे. सभामंडपाचे काम मार्गी लागल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, साची कोलते, सुवर्णा संसारे, देवानंद पालांडे, अशोक गावडे, सूर्यकांत गावडे, सरपंच दक्षता पालांडे, उपसरपंच नितीन जाधव, रामाने गुरुजी, अशोक नागले, किसन नागले व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप मोरे गुरुजी यांनी मानले.












