कणकवली : शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या मुलींच्या छेडछाड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरासह परिसरातील नागरिकांनी एकत्र येत कणकवली पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. हा मोर्चा तेली आळी येथून सुरू होऊन बाजारपेठ मार्गे पोलीस ठाण्यावर पोहोचला. काळ्या रंगाच्या फित लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
“शहरातील महिला भगिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?”, “बंद करा बंद करा परी सलून बंद करा”, “परी सलूनचे मालक पुनम महेश मिठबावकर यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे” अशा आशयाचे फलक हातात घेऊन नागरिकांनी संताप व्यक्त केला.
मोर्चामध्ये महिला व युवकांचा मोठा सहभाग होता. यावेळी मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, मेघा सावंत, प्रांजली आरोलकर, स्नेहा हरणे, मिथुन ठाणेकर, गौरव हरणे, सुशांत नाईक, संदेश पारकर, तात्या निकम, अनुप कांबळे, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, वैभव मालवणकर, उमेश आरोलकर, भाऊ आरोलकर, दिव्यांग संघटनेचे सुनील सावंत, सचिन सादये, आदेश कारेकर, यल्लाप्पा कट्टीमणी, बाळू मेस्त्री, संकेत नाईक, मयूर राणे, सुजित जाधव आदी सहभागी झाले होते.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.













