चिपळूण : तालुक्यातील सती चिंचघरी येथे घराबाहेर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश गजानन चाळके (वय ५७, रा. सती चिंचघरी, ता. चिपळूण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १० मे रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर रस्त्यालगत उभी केलेली हिरो कंपनीची पॅशन प्रो दुचाकी (एमएच ०८ एके ४६९३) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.













