डीबीजेत महात्मा गांधी जयंती

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय स्वायत्त मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा.सुहास बारटक्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘गांधीजींचे शिक्षण विचार’ या विषयावर त्यांचे व्याख्यान संपन्न झाले.
प्रमुख वक्ते प्रा.सुहास बारटक्के यांनी आपल्या मनोगतात जगावर गारूड घालणारा विसाव्या शतकातील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी. शिक्षण हे अनुभवजन्य असावे.शिक्षण हे जीवनाशी जोडले गेले पाहिजे.ते कालानुरूप बदलते असावे.गांधीजींच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे व्यक्तित्वाचा सर्वांगिण विकास, मन ,मेंदू आणि मणगट यांचा विकास महत्त्वाचा.शिक्षण मोफत आणि सक्तीचे असावे, आणि ते मातृभाषेतून हवे .त्या शिक्षणाला स्वावलंबन आणि उद्योजकता असावी असे गांधीजीचे शिक्षण विचार त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले. प्राचार्य माधव बापट यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात त्याकाळात गांधींनी व्यक्त केलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत हेच त्यांचे मोठेपण आहे असे मत व्यक्त केले. यावेळी अतुल चितळे, प्राचार्य डॉ माधव बापट, डॉ चेतन आठवले, उपप्राचार्या डॉ.ऋचा खवणेकर, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्या प्रा.स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, प्रा.सुहास वाघमोडे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.ज्ञानोबा कदम यांनी तर आभार प्रा.सुनिल भादूले यांनी मानले.