समृह नृत्य स्पर्धेत न्यू इंग्लिश उभा दांडा प्रशालेचे यश

वेगुर्ला l प्रतिनिधी :वेंगुर्ले नगरपरिषद शतकोतर सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सव भारतीय संस्कृती समुह नृत्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांड वेंगुर्ला प्रशालेच्या जय मल्हार या समूह नृत्याला ते प्रथम उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आला.

या स्पर्धेत अनेक दर्जदार संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभा दांडा येथील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत या स्पर्धेमध्ये भाग घेतला यात श्रुती श्रीधर शेवडे.

गंधाली अनंत केळुसकर.

हर्षाली सुरेश आरोलकर.

योजना रावजी कुर्ले.

महिमा रुपेश नार्वेकर.

जिया पांडुरंग साळगावकर.

खुशी बाबुराव नार्वेकर.

गायत्री लक्ष्मण वरगावकर.

साची मोहन गिरप या सर्व विद्यार्थीनी सहभागी झाल्या त्याच बरोबर सध्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये अध्यपिका म्हणुन कार्यरत असणाऱ्या या शाळेच्या माजी विद्यार्थीनी गायत्री चेंदवणकर यानी सुध्दा या समुहनृत्यात भाग घेत दमदार नृत्य केलं.

या समुहनृत्यातील कलाकाराना रंगभुषा किंजल चंद्रहास नार्वेकर या माजी विद्यार्थिनीने केली .

या समूह नृत्य स्पर्धेसाठी या प्रशालेच्या निवृत्त अध्यापिका गडहिंग्लज कोल्हापुरच्या सौ. मोहिते मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले त्याच विद्यमान मुख्याध्यापिका सौ.भिसे मॅडम प्रशालेचे लिपिक अजित केरकर, कर्मचारी दीपक गोठसकर , तसेच सध्या रत्नागिरी येथील बा.प. कदम कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापक म्हणुन कार्यरत असणारे आणि पुर्वी न्यु इंग्लिश

उभादांडा या ठिकाणी अध्यापन करणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा.वैभव खानोलकर सर तसेच

श्रीधर शेवडे आणि परिवार रूपेश नार्वेकर आणि परिवार यांनी या नृत्यासाठी सहकार्य केले .

या या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावलेल्या उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या संघाला रोख रुपये त्याचबरोबर मानचिन्ह देऊन गौरवलं गेलं

या यशाबद्दल न्यू एज्युकेशन सोसायटीचे उभा दांडा ,वेंगुर्ले अध्यक्ष वीरेंद्र आडरकर, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर सचिव ज्येष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले आधी पदाधिकारी यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन केले.