आमदार दीपक केसरकरांच्या हस्ते उत्कृष्ट पतसंस्थांचा गौरव
आंबोली (प्रतिनिधी) : आंबोली सिंधुदुर्ग सैनिक स्कूल येथे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, सावंतवाडी आणि सहयोग जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६ सर्व घटकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचे आयोजन जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी केले होते. सुनील राऊळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हे अधिवेशन उत्तम प्रकारे यशस्वी केले, बद्दल उपस्थितांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.
या अधिवेशनाला रविवार सकाळी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांनी भेट देऊन उपस्थितांचे अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना आमदार दीपकभाई केसरकर म्हणाले की, पतसंस्थांच्या माध्यमातून आपण समाजात चांगले काम करत आहात. यापुढेही समाजासाठी असेच चांगले काम करा आणि जिल्ह्यात सहकाराची यशस्वी वाटचाल अशीच सुरू ठेवा. सध्याच्या युगात आर्थिक व्यवहारात सायबर क्राईममुळे नुकसान होत आहे. अनेक गोष्टी आपल्या दैनंदीन कामकाजात आवश्यक असतात, त्यावर मात करून आपले दैनंदीन कामकाज कसे करायचे आणि कोणती काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन आपल्याला घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या वेळी जिल्ह्यात यशस्वी रित्या काम केलेल्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पतसंस्थांचा सन्मान प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी, सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा राज्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित ओरोस, सिंधुदूर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित ओरोस, पंचद्रविड ब्राह्मण सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी, स्नेह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी, वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आचरा, परमपूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण, गिर्ये सहकारी पतसंस्था मर्यादित गिर्ये, देवगड तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरगाव, श्री चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली, मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली, माहेर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली, विद्या सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, डॉक्टर बाळासाहेब सावंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ, सर्वोदय सहकारी पतपेढी मर्यादित सावंतवाडी, सर्वोदय नगर सहकारी पतसंस्था मर्यादित माणगाव, सिंधुदुर्ग जिल्हा किराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ, भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बांदा, सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय / निम शासकीय सहकारी पतपेढी मर्यादित कुडाळ, सिंधुदुर्ग जिल्हा कृषि कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित ओरोस, तळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. तळवडे, पंचम खेमराज महाविद्यालय कर्मचारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी, नवदुर्गा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आयी, बांदा नवभारत शिक्षक प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित बांदा, देवबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित देवबाग, रोझरी ख्रिश्चन ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मालवण, वीर सावरकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी, श्रीधर नाईक नवजीवन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवली, माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्यादित दोडामार्ग, सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सावंतवाडी, वैभववाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित वैभववाडी, कोचरे उत्कर्ष डॉ. शिरोडकर सहकारी पतसंस्था मर्यादित कोचरे आणि साधना महिला सहकारी पतसंस्था मर्यादित कुडाळ या सर्व पतसंस्थांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी व्यासपीठावर माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपकभाई केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक बाबुराव कविटकर, जॉय डान्ट्स, जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नासीर काझी, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष दीपक पटवर्धन, महेश्वर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैनिक स्कूलचे शिक्षक ऋषिकेश गावडे यांनी केले.














