दांडी समुद्र किनाऱ्यावरील घटना
मालवण (प्रतिनिधी) : मालवण दांडी समुद्र किनारी भरधाव वेगाने थार गाडी चालवत स्टंटबाजी करणाऱ्या एका पर्यटक तरुणाच्या स्टंटबाजी दरम्यान गाडीची धडक बसण्यापासून एक स्थानिक युवती थोडक्यात बचावली.
दरम्यान, काही काळ स्टंटबाजी केल्या नंतर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाने गाडी किनाऱ्यावर वाळूत उभी करून समुद्राच्या पाण्यात उड्या मारण्याचा प्रकार केला. या स्टंटबाज तरुणाची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.












