रत्नागिरी : “रक्तदान हेच श्रेष्ठदान” याच संदेशाला धरून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चॅप्टरतर्फे येत्या शुक्रवारी (दि. ११ ऑगस्ट) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि ज्युनिअर रेड क्रॉसच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. रेड क्रॉसच्या रक्तपेढीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता हे शिबिर सुरू होणार आहे. रक्तदानाचे महत्त्व ओळखणाऱ्या सर्वांनी या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि रक्तदान करावे, असे आवाहन सॅटर्डे क्लबतर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष प्रतीक कळंबटे (91306 30260), प्रकाश भुरवणे (8275919821) किंवा सागर वायंगणकर ( 97696 38327) यांच्याशी संपर्क साधावा.












