कुशिवडे गावातील ओबीसींचा सर्वानुमते जनगणना करण्यास विरोध

चिपळूण तहसीलदार यांना दिले निवेदन

चिपळूण : सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात चिपळूण तालुक्यातील ओबीसी बांधवांचा विरोध होतांना दिसतो. ओबीसी समाजाचा स्वतंत्र जातनिहाय रकाना नसल्याने हा विरोध होत आहे. असाच विरोध तालुक्यातील कुशिवडे गावातील ओबीसी बांधवांनी केला असून त्यासंदर्भातील निवेदन त्यांनी चिपळूण तहसीलदार यांना दिले आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की,
आमची कुशिवडे ग्रामपंचायत दि. २८ एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायतीच्या ठराव क्र. ७ नुसार राष्ट्रीय जनगणना २०२७ मध्ये ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना होणारच नाही तर २०२७ च्या जनगणनेसाठी ग्रामस्थ तयार होणार नाहीत. असा ठराव केला आहे. जनगणनेसाठी ग्रामस्थांचा विरोध राहील असे ग्रामस्थ यांनी सर्वानुमते ठरवले आहे. आमच्या कुशिवडे गावाला जनगणना करण्यासाठी २ प्रगणक आले आहेत. तरीही सदर जनगणना २०२७ च्या जनगणनेत इतर मागासवर्ग (ओबीसी) साठी स्वतंत्र रकाना नसल्याने समस्त गावकरी विरोध करत आहोत. जोपर्यंत सदर जनगणने इतर मागास वर्ग (ओबीसी) स्वतंत्र रकाना येत नाही. तोपर्यंत आम्ही समस्त गावकरी नागरिक गाव स्तरावर जनगणना -२०२७ मध्ये सहभागी होणार नाही. या जनगणनेला समस्त गावकरी विरोध करत आहोत असे या निवेदनाद्वारे त्यांनी तहसीलदार यांना सूचित केले आहे. त्यामुळे आता गावा गावातून होणारा विरोध म्हणजेच ओबीसी समाज जागृत होत असल्याची पोच पावती आहे. कुशिवडे गावातील ओबीसी बांधवांनी ग्रामसभेत ठरव करून असा निर्णय घेतला आहे.