एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी ः प्रतिनिधी
बँकेची तसेच जनतेच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याच्या उददेशाने एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करणार्‍या चार जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फसवणूकीची ही घटना 8 जून ते 26 ज्ाून 2023 या कालावधीत घडली आहे.
अभिजित दिलीप जाधव (रा.रत्नागिरी),संजय सुर्वे (रा.अंधेरी पूर्व,मुंबई),अरुण शिंदे आणि अजित राव (दोन्ही रा.मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात गणेश रावसाहेब पाटील (39) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,या चार जणांनी बँकेची तसेच जनतेच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याच्या उददेशाने एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करुन ती कागदपत्रे खरी आहेत असे भासवून एस.व्ही.सी बँकेची फसवणूक केली.त्यांच्या विरोधात भादंवि कायदा कलम 406,420,465,467,468,471,511,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.