तिरवडे पूर्ण प्राथमिक शाळेत रानभाजी, तृणधान्य पाककृती स्पर्धा आयोजन
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील तिरवडे पूर्ण प्राथमिक शाळेत आयोजित रानभाजी पाककृती स्पर्धेत सुवर्णा तिळवे (कुडाच्या शेंगाची भाजी पाककृती) तर तृणधान्य पाककृती स्पर्धेत रुपाली गावडे (नाचणी इडली व बाजरी खीर पाककृती) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
माता पालक या स्पर्धेत बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. स्पर्धा परीक्षण विषयतज्ञ आरती कांबळी व नांदोस गावकरवाडाचे शिक्षक चंद्रसेन पाताडे यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा वंटे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विकास गावडे, उपशिक्षिका उन्नती कराळे व शिक्षक किरण चेंडगे उपस्थित होते.
स्पर्धेचा उर्वरित निकाल- तृणधान्य पाककृती स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्रीमती सुषमा कदम (ज्वारीचे अप्पे), तृतीय क्रमांक श्रीमती अमेया मुळीक (पौष्टीक धिरडे) यांना मिळाला. तर रानभाज्या पाककृती स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्रीमती भागीरथी तिळवे (एका पानाची भाजी), तृतीय क्रमांक श्रीमती अनुष्का गावडे (फागलाची भाजी) यांनी पटकाविला. यावेळी विजेत्यांना वस्तूरुप बक्षिसे देण्यात आली. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना वस्तूरुप भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेखा वंटे यांनी केले. सूत्रसंचालन उन्नती कराळे यांनी केले. किरण चेंडगे यांनी आभार मानले.
फोटो – तिरवडे येथे आयोजित पाककृती स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (अमित खोत, मालवण)












