येरडव-मुंबई एस. टी. बस पुन्हा १६ ऑगस्ट पासून पूर्ववत सुरू होणार

पाचल (वार्ताहर): राजापूर एस.टी. आगारातून अचानक बंद करण्यात आलेली येरइव मुंबई एस. टी. -बुधवार १६ ऑगस्ट पासून पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याने अर्जुना परिसर व पाचल पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.राजापूर, लांजा, पाली आणि संगमेश्वर या चार तालुक्यातून मुंबईला दिवसा जाणारी येरंडव -मुंबई एकमेव एस.टी. बस गेल्या ६० वर्षापासून सुरू असून या एस.टीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. काहि दिवसापूर्वी राजापूर एस.टी. आगारातून मुंबईला जाणारी येरडव मुंबई एस.टी. अचानक बंद करून ती येरडव रत्नागिरी करण्यात आली – होती.
त्यामुळे मुंबईला जाणा-या प्रवाशांची फारच गैरसोय होत होती. प्रवासांच्या होणा-या गैरसोयीची दखल घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सरचिटनिस आण्णा पाथरे यांनी पाचल ग्रामपंचायती मध्ये आढावा बैठकीला आलेले आमदार डॉ. राजन साळवी यांच्याकडे येरडव -मुंबई बंद असलेली एस.टी. पुन्हा सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. आण्णा पाथरे यांच्या मागणीची आणि प्रवाशानची होणारी गैरसोय लक्षात घेवून आमदार डॉ. राजन साळवी यांनी तातडीने राजापूर आगार प्रमुखांशी संपर्क साधून येरडव मुंबई एस. टी. पूर्ववत करण्याकरिता प्रयत्न केले. या एस.टीचा – गणेशोत्सवानिम्मीत गावी येणा-या चकमान्यांना फायदा होणार आहे.

महिला प्रवाश्यांना सन्मान योजने अंतर्गत ५०% सवलत तर अमृत महोत्सवी वर्षानिममित ७५ वर्षावरील एसआयडी प्रवाश्यांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे. सदर एस. टी. बस सुरू करण्याकामी पाचल वाहतूक नियंत्रण कक्ष प्रमुख राजेश कांबळे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सरचिटनिस आण्णा पाथरे व पत्रकार सुरेश गुडेकर, सिद्धार्थ रा. जाधव यांनी प्रवाशांच्या होणा-या गैरसोयी बद्दल आवाज उठवला होता.