पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील मुंढर येथील रहिवाशी व मुंबई येथिल प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदार संघ संपर्क अध्यक्ष प्रमोदशेठ गांधी यांच्या वतीने जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा मुंढर नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर ता. अध्यक्ष सुनिल हळदणकर, पत्रकार गणेश कीर्वे, मुंढर ग्रा.प.चे सरपंच प्रदीप अवरे, सुरेश गांधी, श्रीराम विचारे, जितेंद्र साळवी, नितीन कारकर, रमेश गांधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश आग्रे, प्रमोद शिर्के, पोलीसपाटील निलेश गमरे, सचिन चाळके, शाळेच्या मुख्याधिपिका धनश्री पेठकर, रेश्मा राऊत, मानसी शिर्के, शमिका शिर्के, दशरथ कदम, सेजल शिर्के तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते . यावेळी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, छत्री, कंपासपेटी, कलरपेटी, चित्रकला वही, लेजरबुक आदी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना प्रमोद गांधी म्हणाले की, विद्यार्थ्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी माझ्याकडुन जे सहकार्य अपेक्षित आहे ते मी देण्यास तयार आहे असे आश्वासन दिले.












